Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका !
    ताज्या बातम्या

    उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका !

    By October 25, 2018No Comments8 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, दि. २५ –

    माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या सुरेंद्र गडलिंग यांच्यासह इतरांवरील आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे सत्र न्यायालयाने दिलेली मुदतवाढ उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केली. हा राज्य सरकारसाठी दणका आहे. सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, सोमा सेन, रोना विल्सन आणि महेश विचारे यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून माझ्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेली मुदतवाढ बेकायदा असल्याचा दावा करत गडलिंग यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गडलिंग यांच्याशिवाय सोमा सेन, सुधीर ढवळे, रोना विल्सन आणि महेश विचारे यांनाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी आणखी ९० दिवसांची मुदत पुणे न्यायालयाकडे मागितली होती. त्याला दोन सप्टेंबरला मान्यता देण्यात आली होती. यासंबंधीच्या गडलिंग यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या न्या. मृदुला भाटकर यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली.

    संबंधितांवर दहशतवादी कारवाई प्रतिबंधक कायद्याची (यूएपीए) कलमे लावली आहेत. त्यामुळे पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी पुणे न्यायालयाने मान्य केली, अशी माहिती सरकारी पक्षाने सुनावणीदरम्यान दिली; मात्र यासाठी सरकारने वापरलेली प्रक्रिया अयोग्य असल्याचा दावा गडलिंग यांनी केला. ‘यूएपीए’अंतर्गत आरोपपत्र दाखल करताना सरकारी वकिलांनी अहवाल सादर करणे गरजेचे असते. मुदतवाढ का मिळावी, याची कारणेही संबंधितांनी देणे गरजेचे असते. याप्रकरणी पुण्यातील सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या अहवालावर सरकारी वकिलांनी शिक्का मारला; मात्र मुदतवाढीचे कारण दिले नाही, असे आक्षेप गडलिंग यांनी घेतले. न्यायालयाने ते मान्य करून पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif