एरंडोल (प्रतिनिधी) : येथे उघडी असलेल्या खिडकीतून बांबूच्या साह्याने घरातील पर्स काढून त्यातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ६५ हजार ३०० रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी येथील समर्थ कॉलनीतील रहिवासी संदीप सुरेश महाजन यांच्या घरातून लंपास केला ही घटना मंगळवारी रात्री भल्या पहाटे घडली.
कुटुंबातील सर्वजण घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी नामी शक्कल लढवून पर्स बाहेर काढून चोरी केली.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेडकॉन्स्टेबल सुनील लोहार, राजू पाटील, निलेश ब्राह्मणकर ,संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत .

