जळगाव ;- खेळतांना तापलेले पाणी अंगावर पडल्याने दीड वर्षाची ४० टक्के भाजली गेल्याची घटना १२ रोजी चोपडा शहरातील समता नगर येथे घडली. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात चिमुकलीला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांची माहिती अशी की, दिदा फातेमा इरफान शेख (दीड वर्षे) रा. समता नगर, चोपडा ही मुलगी १२ फेब्रुवारी रोजी घरात खेळत असतांना उकळलेले गरम पाणी अंगावर पडल्याने गंभीररित्या भाजली गेले आहे. तीला उपचरार्थ चोपडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अंगाची आग होत असल्याने चिमुकलीला जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले आहे. यात चिमुकली ४० टक्के भाजली गेली आहे.