Wednesday, May 25, 2022

ईवॉन कार आणि ट्रकच्या धडकेत इसमाचा मृत्यु !

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पेण-खोपोली बायपास रोडचे काम गेले 2 वर्ष संथपने सुरु आहे. वर्षभर अर्धवट स्थितीत असलेल्या गणपती वाडी येथील चढ़निवर अनेक ठिकाणी मोठीमोठी दगडी पडली आहेत तसेच पावसामुळे रस्ताही खचला आहे. अनेकदा या गावातील नागरिकांनी सदरील कामाच्या बाबत ठेकेदाराशी संपर्कही केलेला आहे. मात्र ठेकेदाराकडून या ठिकाणी दुर्लक्ष केले गेले.

- Advertisement -

आज याच ठिकाणी पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ईवॉन कार (एमएच 06 बीइ 3242) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खोपोलीच्या दिशेने येणाऱ्या हटकेश्वर कंपनीचा ट्रक (क्रमांक एमएच 12 आरएन 2393) याला जोरदार धड़क दिल्याने कारचालक सुरेश कदम रा. गणपतीवाडी याचा जागीच मृत्यु झाला.

गावातील नागरिकांनी काही तास रास्ता बंद करून ठेवला होता. पोलिस आणि गावकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची ही झाली. ठेकेदार आणि इजिंयर याला आत्ता इथे बोलावून मयत इसमाच्या नातेवाइकांना मदत करण्याची, रास्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावन्याची आणि ठेकेदारा सहित इंजीनियरवर सदोष मुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी पोलिस निरीक्षक जितेंद्र पोळ यांच्याकडे केली. सदरील अपघाताची नोंद पेण पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या