ईदनिमित्त जनसेवा विचारधारा फाउंडेशनतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण व कार्यक्रम उत्साहात

0

जळगाव;- ईदनिमित्त शहरात ठिकठिकाणी जनसेवा विचारधारा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण करण्यात येऊन हिंदू मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या . तसेच हिंदू मुस्लिम बांधवाना रोपांचे वाटप करण्यात आले . याप्रसंगी सकाळी शिवाजीनगर येथे कब्रस्थान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला . पिंप्राळा ,ख्वाजा नगर,सुन्नी ईदगाह कब्रस्थान आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली . यावेळी जनसेवा विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश बोरा , खजिनदार सीताराम भोई, समाधान पवार,अशोक लोहार, हजरत बिलाल संस्थेचे अध्यक्ष अकील पैलवान , युनूस खान ,शेख महमूद , अझर शेख,हकीम अली, सादिक शेख, हबीब मिस्त्री ,इम्रान खान यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.