रमजान ईदची कारवाई सकाळी ८.३० पासून सुरू होणार
ईदसाठी मंगळवारी रात्री होणार रुहते हिलाल ची मीटिंग
जळगाव :- मुस्लीम कब्रस्थान व ईदगाह ट्रस्ट च्या कार्यकारिणीने एक ऐतेहासिक निर्णय घेऊन रमजान ईद च्या कार्यक्रमाची रूप रेषा (मिनिट टू मिनिट कार्यक्रम) तीन दिवसा पुर्वी घोषित केला असून त्या मूळे समाजातील सर्व घटकांना पूर्व कल्पना मिळेल व त्यांची मानसिकता सकारात्मक होऊन रमजान ईद ची नमाज चा सोहळा व इतर कार्यक्रम वेळेवर होतील असा विश्वास ट्रस्ट चे अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांनी व्यक्त केला व तसे आशयाचे पत्रक जनरल सेक्रेटरी फारूक शेख यांनी प्रसिद्धीला दिले आहे
ईद ची नमाज ची रूप रेषा
★सकाळी ८.३० ते ८.४५ मुफ्ती अतिकउररहेमान चे उर्दू मध्ये खुतबा (प्रवचन)
★सकाळी ८.४५ ते ८.५५ जनरल सेक्रेटरी फारूक शेख ट्रस्ट चा आढावा सादर करतील
★८.५५ ते ९.०० अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक ट्रस्ट च्या पुढील कामकाजाचे प्रोजेक्ट सादर करतील
★९ ते ९.०५ ईद ची नमाज ची पद्धत मौलाना नासिर समजावून सांगतील
★९.०५ ते ९.१० ईद गाह ट्रस्ट च्या कामा साठी जागेवरच चंदा जमा केला जाईल
★९.११ ते ९.१७ मौलाना उस्मान कासमी नमाज अदा करतील
★९.१८ ते ९.२५ अरबी खुतबा
★९.२६ते ९.३५ दुआ
★९.३६ ते ९.४० आभार
★ ईदमुबारक देऊन कार्यक्रमाची सांगता.
ट्रस्ट तर्फे आवाहन
◆ईद गाह मध्ये अत्यंत लहान मुलांना आणू नये
◆घरून येतांना वजू करूनच यावे
◆ईद गाह मध्ये ट्रस्ट च्या विविध कामा साठी चंदा जमा करणार असल्याने तसेच इतर मदरसा व मस्जिद च्या कामा साठी सुध्दा चंदा द्यावयाचा असल्याने येतांना खिशात काही रक्कम घेऊन यावी.
◆ईद गाह मध्ये वजू साठी कासम वाडी कडून,ईद गाह मस्जिद कडून, व ईद गाह ऑफिस कडून येणाऱ्या साठी व्यवस्था आहे.
असे आवाहन अध्यक्ष गफ्फार मलिक, व मानद सचिव फारूक शेख यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.