Friday, September 30, 2022

ईडी – सिडीच्या चर्चेचे निरर्थक गुऱ्हाळ…!

- Advertisement -

भारतातील ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकारे नाहीत त्या- त्या राज्यात केंद्र सरकारच्या वतीने तेथील सत्ताधारी पक्षमाच्या नेत्यांवर, मंत्र्यांवर तसेच आमदार – खासदारांवर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या संस्थाच्या वतीने ससेमिरा लावला जात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, खासदार व आमदार यांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. यामध्ये भाजपचे पूर्णपणे राजकारण असून दबावतंत्राचा वापर केला जातोय हे साधं शेबडं पोरसुध्दा सांगू शकेल. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे तर जणू ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या संस्थांचे अधिकृत प्रवक्ता असल्यासारखी वक्तव्ये करताहेत.

- Advertisement -

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांच विकेट पडली. आता तिसऱ्या मंत्र्याचा नंबर आहे. त्यांची विकेट पडणार आणि कुणाकुणाची ईडीकडून चौकशी होईल त्याची यादीच जणू ते जाहीर करताहेत. ज्या किरीट सोमय्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारले. त्यांना अडगळीत टाकले आता त्यांचाच उपयोग अशी प्रकरणे काढण्यासाठी जणू पूर्ण मुभा दिली जातेय. एवढेच नव्हे तर त्यांना केंद्रातर्फे झेड सिक्युरिटी पुरविण्यात येते हे विशे. कोरोना महामारी, गणेशोत्सव, विकासकामे राहीले बाजूला फक्त दिवसभर ईडीच्या कारवाईबाबत चर्चा हेते. सर्वसामान्यांची मात्र या प्रकारामुळे करमणूक होतेय. कारण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आज हे सरकार पडणार, उद्या गडगडणार, तीन चाकी रिक्षाचे चाक निखळणार वगैरे वगैरे भाकितं करून झाली. परंतु महाविकास आघाडी सरकार कोसळत नाही हे लक्षात आल्यावर ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स आदींचा वापर सुरू झाला.

- Advertisement -

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री भाजप जडण घडणीतील एक ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर मात्र त्यांचे मागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला. ते भाजपात होते तोपर्यंत खडसे चांगले  होते. भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले त्यानंतर मात्र लागलीच ते घोटाळेबाज झाले. म्हणून सध्या ते ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या चौकशीला ते समर्थपण तोंड देत आहेत. ईडी सीबीआय आदिचा महाराष्ट्रातील जनतेला वीट आलाय. त्यांना तुमच्या राजकारणाशी काही देणे – घेणे नाही. त्यांना हवाय विकास कामे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षातील विरोधी पक्षांच्या एक कलमी कार्यक्रमाला जे कंटाळले आहेत. काल अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकिच्या पेट्रोल पंपाच्या भूमिपुजनप्रसंगी ईडी-सिडीच्या चर्चेपेक्षा विकास महत्वाचा आहे, असे वक्तव्य केले. गुलाबराव पाटलांनी केलेल्या या वक्तव्याद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. ते पुढे असेही म्हणाले.

की, विरोधी पक्षांनी कितीही वल्गना केल्या आणि दबावतंत्र वापरले तरी महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात पाच वर्ष पूर्ण करणारच. गुलाबरावांच्या या वक्तव्यावर आत्मविश्वास होता. अन्यथा गुलाबराव पाटील जशास तसे उत्तर देण्यात माहिर आहेत. परंतु त्यांना सुध्दा विरोधकांकडून होणाऱ्या आरोपाच्या विट आलेला आहे. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या पेट्रोलपंप भूमिपूजन प्रसंगी कृउबाचे तोंड भरुन कौतुक केले. ईडी-सिडीच्या चर्चेत कुणाला रस नाही हे त्यांनी स्पष्ट केले. हिंदी सिने अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या कथित मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवून त्यांचे कडील चौकशी सीबीआयकडे देण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आटापिटा केला.

वर्ष उलटून गेले सीबीआयचा तपास पुढे सरकलाच नाही. सीबीआय चौकशीचे पुढे काय झाले हे कळायला मार्ग नाही. परंतु सीबीआय चौकशी झाली तर त्यात उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गळाला लागतील असा जाहीर आरोप केले जात होते. परंतु सीबीआयकडे चौकशी गेली नसती तर सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडून लागला असता आता मापही गेले आणि तूपही गेले अशी विरोधकांची आणि केंद्र सरकारची अवस्था झालीय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मात्र पुन्हा तोच ईडीच्या दबावतंत्राचा वापर होतोय. राजकारण फार खालच्या थराला चालले आहे. अशा प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केलेले वक्तव्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या