Saturday, December 3, 2022

ईच्छादेवी ते डीमार्ट दुभाजकाचे काम थांबवले

- Advertisement -

तीन महिन्यांपूर्वीच वर्क ऑर्डर; मक्तेदाराच्या मनमानीविरुद्ध महासभेत विषय मांडणार- प्रशांत नाईक

- Advertisement -

जळगाव, दि. 26-

- Advertisement -

- Advertisement -

ईच्छादेवी ते डीमार्ट या रस्त्याच्या दुभाजकाचे व पोल शिफ्टींगचे काम मक्तेदाराने मनमर्जीने थांबविले आहे. सदर कामाची तीन महिन्यापुर्वीच वर्कऑर्डर झाली असताना काम विनाकारण थांबविण्यात आले आहे. या विषय महासभेत मांडणार असल्याची माहिती नगरसेवक प्रशांत नाईक यांनी लोकशाहीशी बोलताना दिली.

मनपा प्रशासनाने मोठा गाजावाजा करत ईच्छादेवी ते डी मार्ट रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. सदर परिसर संवेदनशील असूनही अतिक्रमण मोहिम परिसरात शांततेत पार पडली. शहराच्या विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्याची भावना दाखविली. अतिक्रमण हटविल्यानंतर ईच्छादेवी ते डीमार्ट या रस्त्यावर दुभाजक तयार करण्यात येणार होते. रस्त्यावर मधोमध किंवा वाहतुकीला अडसर ठरणारे विद्युत खांब दुभाजकात घेण्याचे मनपाचे नियोजन होते. त्यासाठी मनपा प्रशासनाने लाखो रुपये खर्च करत तीन महिन्यांपुर्वी सदर कामाची वर्क ऑर्डरही दिलेली आहे. मात्र माशी शिंकली कुठे? आजतागायत या कामाला सुरुवात झालेली नाही. ईच्छादेवी ते डीमार्ट हा महत्वाचा मार्ग असून या रस्त्यावरुन शिरसोली, मोहाडी, पाचोरा, चाळीसगाव अशी वाहतूक होते. शहरात येणार्‍या किंवा जाणार्‍या चाकरमान्यांसह या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असते. पोलीस प्रशासनाची मदत घेवून भली मोठी कारवाई करत अतिक्रमण हटविल्यावरही पोल शिफ्टींगच्या रखडलेल्या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. तर विद्युत खांबाअडून अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. काम थांबविणार्‍या मक्तेदाराच्या मनमर्जीविरुद्ध 6 जून रोजी होणार्‍या महासभेत विषय मांडणार असल्याचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सांगितले.

गणेश कॉलनी रस्त्याचे काम संथगतीने

ईच्छादेवी ते डीमार्ट व गणेश कॉलनी रस्त्यावर दुभाजक व पोल शिफ्टींगचे काम होणार होते. गणेश कॉलनी ते ख्वाजा मिया, बाबू गेनू नगर चौकापर्यंत नवीन विद्युत खांब टाकण्यात आले आहेत. मात्र रस्ता दुभाजकाचे काम अतिशय संथगतीने चालू आहे. नवीन खांब उभारुन पोल शिफ्टींग न केल्याने नवीन खांब व जुने खांबही रस्त्यावर असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटविण्यात  आले. मात्र खांब जैसे थे असल्याने रस्ताची रुंदी कमीच आहे. सदर रस्त्यावर अतिक्रमणही वाढलेले आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या