‘इस्रो’च्या रिसेट – 2 बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

0

श्रीहरीकोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी RISAT-2B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. बुधवारी पहाटे इस्रोने Risat- 2BR1 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. तामिळनाडूतील श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचे पीएसएलव्ही-सी60च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जाते होते कारण रिसेट उपग्रह मालिकेतील हा चौथा उपग्रह होता. या उपग्रहामुळे शत्रूवर नजर ठेवणे आणि नैसर्गिक आपत्तीवेळी माहिती जमा करता येणे शक्य होणार आहे.

RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर शेती, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल. त्यामुळे या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले. RISAT-2B च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रो चंद्रयान-२ मोहीमेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.