Monday, September 26, 2022

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगावमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव, विदयार्थी विकास विभाग आणि छत्रपती शाहू महाराज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18 वर्षावरील आय.एम.आर मधील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती.

- Advertisement -

- Advertisement -

१८ वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालिका प्रा. डॉ. शिल्पा किरण बेंडाळे यांनी लसीकरण मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी केले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर लसीकरण मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. लसीकरण झालेल्या विदयार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्र देखील देण्यात आले.

या प्रसंगी छत्रपती शाहू महाराज रुग्णायलातील आरोग्यसेवक साधना चव्हाण व मयूर इंगळे यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास प्रा. तनुजा फेगडे, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. दिपाली पाटील, प्रा. स्वप्नील काटे, प्रा. संदीप घोडके, सयाजी जाधाव, वेदांत दुसाने, अक्षद बेंद्रे, संस्कृती नेवे, उमेश देशमुख यांचे सहकार्य लाभले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या