यावल :– तालुक्यातील इचखेडा शिवारात शेताची ट्रक्टरव्दारे मशागत करतांना ट्रक्टर अनियंत्रीत होत कलंडले त्यात स्वत:हा चालक दाबला जावुन जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजेला घडला मयताचे नाव प्रमोद देवराम तायडे वय 38 रा. किनगाव खुर्द असे आह ेया घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
किनगाव खुर्द येेथील रहिवासी कांदा व्यापारी तथा भाडे तत्वावर शेत मशागत करून देण्याचे काम प्रमोद देवराम तायडे वय 38 हे करायचे तर सोमवारी किनगाव पासुन सातपुड्या कडे सातपुड्याच्या पायथ्याशी इचखेडा शिवारात ते अशाचं एका शेतात ट्रक्टर क्रमांक एम. एच. 19 – 4719 व्दारे रोटर करण्यास गेले होते दुपारी ते रोटर करतांना अडीच वाजेच्या सुमारास त्या शेतातील शेतविहिरी जवळ अचानक ट्रक्टर कलंडले व या अपघातात प्रमोद तायडे हा थेट ट्रक्टर खाली दाबला जावुन जागीचं गतप्राण झाला तर सदरी घटनेची माहिती गावात मिळाल्यावर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याचा मृतदेेह ट्रक्टर खालुन काढला व यावल ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदना करीता आणण्यात आला तर या बाबत पोलिसात अपघाताची माहिती देण्यात आली तर हवालदार सुनिल तायडे या प्रकरणी गुन्ह्याची नोद घेत होते. तर मयत प्रमोद तायडे यांच्या पश्चात म्हातारी आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अशा अपघाती निधनामुळे किनगाव सह परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.