Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही ; मुनगुंटीवारांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर
    राजकारण

    इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही ; मुनगुंटीवारांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर

    By March 13, 2020No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत चांगलीच टोलेबाजी केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असं सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा देणाऱ्या भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना अजित पवार यांनी उत्तर दिलं. सुधीर मुनगंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली. पण आता चुकीला माफी नाही, असं अजितदादा म्हणाल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तिकडे (भाजप) होणार नाही याची काळजी घ्या, असा उपरोधिक सल्लाही अजितदादांनी मुनगंटीवारांना दिला आहे. त्यानंतर लागलीच मुनगंटीवारांनी अजित पवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

    “शिवसेनेला फसवलंय, पण सेना एवढी संमोहित झालीय की, त्यांना दिसत नाही. आम्ही चुकलोय, पण त्याचा एवढा फायदा घेऊ नका. तुमच्याकडेही ज्योतिरादित्य शिंदे होईल,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    यावर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना चित्रपटाचा डायलॉग म्हणत उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले की, “सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली. पण आता चुकीला माफी नाही.” हे वक्तव्य करताना अजित पवार यांनी बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कटाक्ष टाकला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही मानेने नकार देत चुकीला माफी नसल्याचं सूचित केलं. तसंच “आपलं सरकार होणार आहे, होणार आहे, असंच तुम्हाला पाच वर्ष म्हणावं लागेल. इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तिकडे (भाजप) होणार नाही याची काळजी घ्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026

    माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

    August 17, 2026

    अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif