मुंबई : खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 19 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जळगावमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. पेट्रोल- ९८.,६१ प्रती लिटर तर डीझेल ८८.२५ प्रती लिटर आहे
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव
नवी दिल्ली : 91.17 रुपये प्रतिलीटर
मुंबई : 97.57 रुपये प्रतिलीटर
कोलकाता : 91.35 रुपये प्रतिलीटर
चेन्नई : 93.11 रुपये प्रतिलीटर
नोएडा : 89.38 रुपये प्रतिलीटर
देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
नवी दिल्ली: 81.47 रुपये प्रतिलीटर
मुंबई : 88.60 रुपये प्रतिलीटर
कोलकाता : 84.35 रुपये प्रतिलीटर
चेन्नई : 86.45 रुपये प्रतिलीटर
नोएडा : 81.91 रुपये प्रतिलीटर
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.