इंधन दर ; जाणून आजचा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

0

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. मात्र देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. मागील १० दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही.

 

यापूर्वी १० दिवसआधी पेट्रोल २२ पैसे तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त झाले होते. करोना व्हायरसचा प्रकोप वाढल्यानंतर लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र पुन्हा त्यात तेजी दिसून आली आहे.

 

आज शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे.

 

कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.५८ रुपये आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून गेल्या आठवड्यात मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.