इंधन दरवाढ सुरूच ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे नवीन दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा दणका दिला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी २९ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर १००.४७ रुपये झाला आहे. तर डिझेलसाठी ९२.४५ रुपये मोजावे लागत आहेत.

यापूर्वी कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दोन्ही इंधन दर जैसे थे ठेवले होते. तर शनिवारी देशभरात पेट्रोल २८ पैसे आणि डिझेल २६ पैशांनी महागले होते. याआधी गुरुवारी मुंबईतील उपनगरांमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव पहिल्यांद १०० रुपयांवर गेला होता. पेट्रोलची शंभरी गाठणारे मुंबई हे देशातील पहिले मेट्रो शहर ठरले होते.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १००.४७ रुपये झाला आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९४.२३ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.७६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९४.२५ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९२.४५ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८५.१५ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.९० रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८८ रुपये प्रती लीटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०२.३४ रुपये असून डिझेल ९३.६५ रुपये झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.