इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने काढली सायकल रॅली

0

जळगाव प्रतिनिधी 

आज काँग्रेस पक्षाने शहरात इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात जनमताचा दबाव मोदी सरकारच्या विरोधात वाढावा म्हणून सायकल रॅलीचे आयोजन केले होते .

पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडवून सामान्यांनादेखील आर्थिक संकटात मोदी सरकारने टाकले आहे. केंद्र शासनाच्या चुकीमुळेच कोर्टाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे, केंद्र शासनाच्या या जनताविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सायकल रॅली प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.

पेट्रोल पंपावर उज्ज्वला गॅस योजना आणि सरकारच्या धोरणांची जाहिरात करणाऱ्या पेट्रोलपंपांवरील फलकावर पंतप्रधान मोदींचे फोटो आहे. आताच इंधन दरवाढीमुळे लोक या फोटोकडे तिरस्काराने पाहतात. लवकर ही दरवाढ कमी झाली नाही तर लोक मोदींच्या फोटोंना शेण लावतील असा संताप आज माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.

तसेच ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारची महागाई नियंत्रणात ठेवण्याची घोषणा आता विश्वासघाताची ठरली आहे. लोकांनी मोठ्या आशेने ज्या महत्वाच्या मुद्द्यांवर जे सरकार निवडून दिले. त्यात महागाईचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता. मात्र सध्या नेमकी उलटी परिस्थिती या सरकारमुळेच आली आहे. या मुद्द्यावर लोकांना जागृत करण्यासाठी आता कॉग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महागाईच्या विरोधात सातत्याने काँग्रेसची आंदोलने सुरू राहतील या आंदोलनांमध्ये दिवसेंदिवस लोकसहभाग वाढवा ही आम्हाला अपेक्षा आहे.

आजची आमची सायकल फेरी १० किलोमीटर अंतराची होती. पुढच्या काळात आंदोलनाची व्याप्ती वाढलेली दिसेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, प्रदेशउपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी व महानगराध्यक्ष श्याम तायडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आंदोलन तिव्र केले जाणार आहे. असे देखील  ते म्हणाले.

याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, इंधन दरवाढीमुळे सर्वत्र महागाई वाढते आहे. उत्पादन प्रक्रिया व वाहतूकीसाठी ज्या ज्या कामात पेट्रोल डिझेल आणि गॅसचा वापर होतो. ती सगळी उत्पादने प्रचंड महागली आहेत. त्यामुळे काँग्रेसचे हे आंदोलन पुढच्या काळात लोक आंदोलन बनावे असे आमचे प्रयत्‍न राहणार आहे. मोदी सरकारच्या धोरणाला सगळेच वैतागले आहेत असेही ते म्हणाले.

या रॅलीमध्ये  माजी खासदार डॉ. उल्हास पाटील  दिलीप पाटील , उदय पाटील, प्रभाकर सोनवणे, भगतसिंग पाटील,  शाम तायडे, प्रदीप पवार, राजीव पाटील, बाबा देशमुख, पाटील, प्रदीप सोनवणे, दीपक सोनवणे, जगदीश गाढे, मुजीब पटेल, अमजद पठाण, आदी सहभागी  होते.

Leave A Reply

Your email address will not be published.