भडगाव (प्रतिनिधी) : मागील वर्षी दि.22 मार्च 2020 रोजी कोरोना काळात भडगाव शहरातील महादेव गल्ली येथे आईचे निधन झाल्याने सुट्टीवर आलेले इंडियन नेव्ही जवान हनुमान पाटील यांनी मागील वर्षी लॉक डाऊनमध्ये कुठलाही मोबदला न घेता भडगाव पोलिसांना खांद्याला खांदा लावून अविरतपणे सेवा बजावली होती.
त्यांच्या या कार्याची दखल घेत भडगांव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर व पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे, पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या हस्ते हनुमान पाटील यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी डॉ. दिनेश तांदळे, पाचोरा पो.कॉ.अमृत पाटील आदी उपस्थित होते. हनुमान पाटील यांनी मागच्या वर्षी लॉक डाऊन मध्ये गेले तीन महिने भडगाव येथे सेवा दिली होती. या दिलेल्या सेवेचा भडगाव पोलिस स्टेशन ने दखल घेऊन केलेला सन्मानाचे खरी देश सेवा केल्याचा अभिमान वाटला असल्याचे हनुमान पाटील यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना सांगितले. या गौरवाबद्दल हनुमान पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.