इंजिनीरिंग कृति समिति महाराष्ट्र राज्य यावल तालुका अध्यक्ष पदी मयूर सोनवणे

0

यावल (प्रतिनिधी) : विकास युवा प्रतिष्ठान अँण्ड एज्युकेशन सोसायटी संचलित इंजिनिअरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य यावल तालुका अध्यक्ष पदी मयूर सुरेश सोनवणे रा. हिंगोणा , यांची एकमताने निवड करण्यात आली. जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय,फैजपुर येथे मयूर यांनी नुकतेच अंतिम वर्ष पूर्ण केले आहे.विद्यार्थी प्रश्न मार्गी लावणयासाठी असलेली धडपड त्याचबरोबर विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात सहभाग लक्षयात घेऊन विकास युवा प्रतिष्ठान अँण्ड एज्युकेशन सोसायटी संस्थापक आकाश हिवराळे व प्रदेशध्यक्ष प्रथमेश निकम . यांच्या मार्गदर्शनाने समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तोषिश पाटील यांनी त्यांची निवड केली.विद्यार्थी प्रश्न मार्गी लावण्याबरोबर सामाजिक कार्यात युवावर्गाचा सहभाग व संघटना वाढीसाठी भर देणार तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थयांना रोजगार कसा उपलब्ध करुन देता येईल याबद्दल समिती प्रयत्न करणार असल्याचे समितिचे यावल तालुका अध्यक्ष मयूर सोनवणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.