आ.हरीभाऊ जावळेंच्या खाजगी वाहनाला अपघात

0

चालकाची प्रकृती गंभीर ; वाहनात आमदार नसताना दुर्घटना

यावल-
मुंबईकडे निघालेल्या आमदार हरीभाऊ जावळे यांना सोडल्यानंतर परतीच्या प्रवासात त्यांच्या खाजगी वाहनाला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या गंभीर अपघातात वाहनाचा चुराडा झाला तर चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी मध्यरात्री भुसावळ-फैजपूर रस्त्यावरील भोरटेकजवळ हा अपघात झाला तर या अपघातात आमदारांच्या वाहनाचा चालक दीपक कोळी गंभीर जखमी झाला. अपघाताचे वृत्त कळाल्यानंतर आमदारांनी आपला नियोजित दौरा रद्द केला.
आमदारांच्या वाहनाचा चुराडा
आमदार जावळे हे मंगळवारी रात्री मुंबईकडे जाण्यासाठी निघाल्यानंतर त्यांचा चालक दीपक कोळी याने त्यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर सोडल्यानंतर परतीच्या प्रवासाहात तो भालोदकडे निघाल्यानंतर भोरटेकजवळ फैजपूरकडून येणार्या भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात चालक कोळी गंभीर जखमी झाला तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भुसावळचे नगरसेवक परीक्षीत बर्हाटे, प्रा.जतीन मेढे, अविनाश कोळी, ज्ञानेश्वर कोळी, किशोर कोळी, महेंद्र कोळी, सागर कोळी, भगवान कोळी व पाडळसेचे पोलिस पाटील सुरेश खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालक दीपक कोळी याला तातडीने रुग्णालयात हलविले.

Leave A Reply

Your email address will not be published.