Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आ. सावकारे यांच्या प्रयत्नांनी कंडारीगावास दलित वस्ती विकास योजनेतंर्गत निधी मंजूर
    जळगाव

    आ. सावकारे यांच्या प्रयत्नांनी कंडारीगावास दलित वस्ती विकास योजनेतंर्गत निधी मंजूर

    By July 1, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लेवा समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न ; ग्रामपंचायतीतर्फे मान्यवरांचा सत्कार

    भुसावळ :– तालुक्यातील कंडारी येथे बाबासाहेब आंबेडकर १२५ वी सुवर्ण जयंती निमित्त, केंद्रशासना कडून दलित वस्ती विकास योजनेतंर्गत (४,२७,३५,०००) ४कोटी २७लाख ३५ हजार रुपयांचा निधी आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाल्याबद्दल कंडारी ग्रामपंचायत तर्फे रविवार दिनांक 30 जून रोजी कंडारी येथे गावक-यांचे वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला.तसेच महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज व नव निर्वाचीत एस सी,एस टि रेल्वे युनियचे मंडळ अध्यक्ष सुधीर जंजाळे यांचा सत्कार कंडारी ग्राम पंचायतीच्या वतीने सरपंच सौ योगिता शिंगारे , संदीप शिंगारे ,यशवंत चौधरी व माजी सरपंच डाॅ सुर्यभान पाटिल यांनी केला.

    प्रसंगी तब्बल 20 वर्षांपासुन प्रलंबित असलेली मागणी पूर्णत्वास आल्याने लेवा समाज मंडळाच्या मंगल कार्यालयाच्या जागेवर महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.तसेच मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले .यावेळी सुरेश यशोदे व संदिप शिंगारे यांनी वार्ड क्रमांग एक मधील १९४५पासुन रहीवास चे सर्व पुरावे व ग्रामसभा घेऊन ग्राम सभेचा ठराव,पुर्ण उतारे,१९५९,६०ते १९९२पर्यत चे घरपंट्टि भरलेली नमुना नंबर ८ चे राजिस्टरची छायांकीत प्रत व घराचे मालकी हक्का चे १९५९ ते १९९२ पर्यत चे जागेचे उतारे सर्व पुरावे सहित आमदार सावकारे यांना निवेदना मार्फत दिले . महामंडलेश्र्वर श्री जनार्दन हरी महाराज यांच्या आगमनामुळे कंडारी गावातील वातावरण प्रसन्न व भक्तिमय झाले होते.

    कार्यक्रमास महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज, आमदार संजय सावकारे, एस. एसटी रेल्वे युनियन मंडळ अध्यक्ष सुधीर जंजाळे, रावत सर, सरपंच योगिता शिंगारे, डॉ सूर्यभान पाटील, संदीप शिंगारे, यशवंत चौधरी, शामा मोरे, फेकरी सरपंच प्रशांत निकम, सरजू तायडे, ग्रामसेवक संघटना सचिव प्रशांत तायडे, ग्रामसेवक बारेला, विजय बार्हे, डॉ उत्तमराव सैंदाणे, सुरेश यशोदे, प्रभाकर महाजन, निलेश महाजन, मोहन महाजन, गणेश महाजन, अमोल भंगाळे, किरण जंगले, हर्षल नारखेडे, कंडारी ग्राम पंचायत सदस्य विनायक वासनिक,रामभाऊ जाधव,जोहरे ,सौ मनिषा महाजन,सुषमा सोनवणे,माधुरी पाटिल, यांचेसह ग्रा पं कर्मचारी आदी उपस्थीत होते. सुत्र संचालन विजय आर बार्‍हे यांनी केले व आभार प्रदर्शन निलेश महाजन यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप शिंगारे,यशवंत चौधरी व माजी सरपंच डाॅ सुर्यभान पाटिल व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif