Sunday, May 29, 2022

आ. संजय सावकारे भुसावळ विकासोमधून विजयी

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांनी  भुसावळ विकासो मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघांतून  संजय सावकारे आणि संतोष चौधरी या आजी-माजी आमदारांनी अर्ज भरल्याने येथील लढत चुरशीची होण्याची शक्यता होती. यातच नगराध्यक्ष रमण भोळे यांनी देखील अर्ज भरल्याने तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळाले होते.

दरम्यान संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्यांनी विभागीय आयुक्त आणि औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली तरी त्यांना परवानगी मिळाली नाही. यामुळे ते रिंगणातून बाहेर गेले. तर रमण भोळे यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्यामुळे आमदार संजय सावकारे आणि शांताराम धनगर यांच्यात लढत निश्‍चीत झाली. आजच्या निकालातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज झालेल्या मतमोजणीत आमदार संजय वामन सावकारे यांना २२ तर शांताराम धनगर यांना ४ मते मिळाली. यामुळे संजय सावकारे यांची संचालकपदी निवड करण्यात आली. ते दुसर्‍यांदा जिल्हा बँकेचे संचालक बनले आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या