Monday, September 26, 2022

आ. लताताई सोनवणेंच्या नेतृत्वात लासुर गावात विकासकामांच्या धडाका

- Advertisement -

लासुर ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

तालुक्याचे आ. लताताई सोनवणे यांचा नेतृत्वात चोपडा तालुक्यात विकासकामांच्या धडाका सुरू असून नुकतेच लासुर तसेच गणपूर येथे येथे ३ कोटी ३८ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यात लासुर गावांतर्गत दोन रस्त्यांचे ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे, हातेड रस्त्यावरील पूल बांधणे, लासुर-हिंगोणा रस्त्यावर पूल बांधणे, गणपूर-गलंगी रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी कामांच्या समावेश आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने जनतेची जास्तीत जास्त काम करण्याच्या प्रयत्न असतो. तालुक्यात १५० कोटींची कामे मंजूर असून जानेवारी महिन्यापर्यंत सर्वच रस्त्यांची कामे सुरू होतील असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी चोपडा विधानसभेचे आ. लताबाई सोनवणे, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, तालुकाप्रमुख मंगला पाटील, जि.प. सदस्य हरीश पाटील, पं.स. सदस्य एम.व्ही. पाटील, सरपंच जनाबाई माळी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष ए.के. गंभीर सर, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिपक चौधरी, तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, तालुका संघटक सुकलाल कोळी, नगरसेवक किशोर चौधरी, प्रकाश राजपूत, कैलास बाविस्कर, बबलू पालीवाल, ग्रा.पं. सदस्य, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या