Sunday, January 29, 2023

आ. रोहीत पवार यांची जामनेरला धावती भेट

- Advertisement -

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. रोहीत पवार यांनी जामनेरला नुकतीच भेट दिली. भेटी दरम्यान कार्यकर्त्याशी संवाद करुन त्यांच्या अडीअडचणी समजुन घेत शहरातील जामनेर ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या नाश्ता सेंटर येथे जावून पोहे, चहा याचा आस्वाद घेतला.

आ. रोहीत पवार हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर असुन मुक्ताईनगर सह  त्यांचे विविध ठिकाणी असलेल्या कार्यक्रमांना ते भेटीसाठी आले आहेत. आज सकाळच्या सुमारास आ. रोहीत पवार यांनी जामनेरात धावता दौरा केला.

- Advertisement -

यावेळी भुसावळ चौफुली जवळ त्यांचा फूल गुच्छ देऊन फटाके फोडून सत्कार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी जामनेर शहर तालुक्यातील पदाधिकारी यांच्याशी हितगुज करून विविध प्रश्न समस्या जाणून घेतल्या. आ. रोहित पवार यांच्या अचानक दिलेल्या भेटीचे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते संजय दादा गरुड, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, ऍड.  ज्ञानेश्वर बोरसे, अरविंद चितोडीया, प्रल्हाद बोरसे, प्रभू झाल्टे यांच्या सह राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे