Sunday, January 29, 2023

आमदार रविशेठ पाटील यांच्या नेत्रुत्वाखाली भाजप बुथ जनसंपर्क अभियान

- Advertisement -

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क 

निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याचे चित्र सध्या पेण तालुक्यात दिसत आहे. पेण विधानसभेचे आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या जनसंपर्क अभियानाला पेण तालुक्यात सुरुवात झाली. या अभियानास दक्षिण रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस शिवाजी पाटील, जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे, जांभळे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय बुथ संपर्क अभियान सर्वत्र सुरू आहे. पेण तालुक्यात शनिवारी सर्वप्रथम वढाव पंचायत समितीची बैठक वढाव येथे संपन्न झाली.  यावेळी  बुथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते. भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बुथ प्रमुखाची खूप मोठी भूमिका असते. बुथ कमिटी अधिक सक्षम करून भाजप पक्ष अधिक बळकट करून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळवायचे आहे असे आवाहन ऍड महेश मोहिते यांनी केले.

- Advertisement -

भाजपच्या व आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून विविध विकासकामे संपूर्ण तालुक्यात सुरू असून पुढे विकास निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन वैकुंठ पाटील यांनी केले. यावेळी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हितगुज करण्यासाठी सर्व मंडळी आली असून आपल्या समस्या त्यांनी या मिटिंग मध्ये मांडाव्यात असे सांगत केंद्र सरकारच्या विविध योजनाची माहिती मिलिंद पाटील यांनी दिली.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे