धरणगाव (प्रतिनिधी) : – दुधाला जादा दर मिळावा यासाठी महायुतीच्या वतीने दि 1आँगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. चाळीसगावी देखील आंदोलन झाले या आंदोलनात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण देखील सहभागी झाले होते. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांचा तोल गेला व उद्धव ठाकरे हे रिकामचोट मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केल्याने याचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक शिवसैनिकांनी त्यांना मोबाईल वर कॉल करून याचा जाब विचारत निषेध केला.
दि ७ऑगस्ट रोजी शिवसेनाचा वतीने धरणगाव नगरपालिका पासून पोलीस स्टेशन पर्यत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी आ मंगेश चव्हाण चा निषेध करून शिवसेना चा वतीने निषेध मोर्चा काढून पोलिस निरीक्षक धरणगाव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचेवर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून मानहानी चा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा उपप्रमुख पी एम पाटील नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी ,गटनेते पप्पू भावे,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे,विभाग प्रमुख संजय चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, विजय महाजन , अजय चव्हाण ,भागवत चौधरी, बापू पारेराव , नंदू पाटील, जितेंद्र धनगर, अहेमद पठाण शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव,अॅड.शरद माळी,धिरेंद्र पुरभे,तौसिफ पटेल,हेमंत चौधरी,चेतन जाधव,पापा वाघरे,विलास माळी, छोटू भाऊ जाधव, सतीश बोरसे , नारायण महाजन , कमलेश बोरसे,विनोद मराठे,दिपक पाटिल,महेंद्र चौधरी,गोपाल चौधरी,अरविंद चौधरी,अमोल चौधरी तसेच सर्व शिवसैनिक व पदाधिकारी आदी उपस्थित होते…