Tuesday, August 16, 2022

आ. मंगेश चव्हाण चव्हाणांच्या निधीतून संत तुकाराम महाराज मंदिर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

शहराच्या गौरवात भर घालणारे व मनःशांतीचे केंद्र म्हणून नावारूपाला येत असलेले क्षत्रिय मराठा समाज विकास मंडळ, चाळीसगाव यांच्या माध्यमातून उभे राहिलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात संरक्षक भिंतीचे बांधकाम चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार असून त्याचा भूमिपूजन सोहळा आज अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत संपन्न झाला.

सदर भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर होते. तर भूमिपूजन १००८ महामंडलेश्वर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री एम. के. अण्णा पाटील, चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

तर हभप ए. बी. पाटील, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, जि. प. सदस्य पोपट तात्या भोळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. बी. दादा साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, माजी जि. प. सदस्य शेषराव बापू पाटील, नगरसेवक राजेंद्रअण्णा चौधरी, मानसिंग राजपूत, वत्सलाताई महाले, बंटी ठाकूर, नितीन पाटील, विजयाताई पवार, चिराग शेख, बंडू पगार, प्रदीप राजपूत, प्रशांत कुमावत, सागर झोडगे, वसंतराव पाटील, केशव पाटील, सुनील पाटील, उत्तम गावडे, राजेंद्र गावडे, राजेंद्र पाटील, सी. एस. पाटील, धर्मा पाटील, सुनील पाटील, लक्ष्मण पगार, बाबासाहेब पगारे, सोमनाथ पगार, बाबा कवडे, गोकुळ शिंदे, कैलास गावडे, छोटू पाटील, दीपक पाटील वीरेंद्र राजपूत, आनंदा पवार सर, रामभाऊ गवळी यांच्यासह  परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज विकास मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष हभप ए. बी. पाटील, कार्याध्यक्ष बंडू पगार यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांनी मनोगताच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले व आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले.

आपल्या मनोगतात १००८ महामंडलेश्वर हभप ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले की, अध्यात्मिक जीवनात वावरत असताना अनेक सामाजिक राजकीय लोकांशी माझा संपर्क येत असतो. अनेक लोक राजकारणात शब्द देतात पण तो पाळताना दिसत नाही किंवा आपण दिलेले शब्द पूर्णत्वास नेत नाहीत, चार चौघात जाहीर केलेले शब्द देखील मागे पडतात. मात्र मंगेश दादांच्या बाबतीत अस कधीच जाणवले नाही. त्यांनी कोठलाही शब्द जर दिला असेल तर तो पूर्णत्वास नेण्यास त्यांचा भर असतो. ते स्वतः या गोष्टीसाठी पाठपुरावा करतात.  हातगाव येथील स्व. हभप. सोमनाथ महाराज नाईकवडे वारले असता त्यांनी मला शब्द दिला होता की, त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी मी ५०००० रुपये मदत करेल आणि कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी तो शब्द पाळला व त्या कुटुंबाला मदत देखील केली असे ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या