आ. मंगेश चव्हाणांना ठोठावला २०० रुपयांचा दंड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जगात आधीच कोरोना विषाणूने थैमान घातले असताना राज्यावर कोरोनाचे नवे संकट ओमायक्रॉनचे संकट वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र जनतेला नेहमी वेठीस धरणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र विसर पडल्याचे वारंवार दिसून येत आहे. राज्यातील अनेक नेते बैठका आणि सभेच्या ठिकाणी विनामास्क फिरताना दिसून येतात. याचदरम्यान,  मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क भिरणाऱ्या भाजपच्या आमदारवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

मंत्रालयाच्या आवारात विनामास्क फिरणाऱ्या भाजपाचे आमदार मंगेळ चव्हाण यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली.

मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असता असं सांगून ठोठावलेला दंड भरला.आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलीसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.