आ.चिमणराव पाटलांच्या स्थानिक निधीतून एरंडोल येथे ५०० रॅपिड टेस्ट किट उपलब्ध

0

एरंडोल (प्रतिनिधी)- प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आज दि.१९ सप्टेंबर रोजी काढलेल्या पत्रकानुसार एरंडोल विधान सभेचे आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या स्थानिक निधी मधुन एरंडोल तालुक्यासाठी ५०० रॅपिड टेस्ट किट उपलब्ध करून दिले आहे.

एरंडोल तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता आमदार चिमणराव पाटील यांनी तत्काळ आपल्या स्थानिक आमदार निधी मधुन ५०० रॅपिड टेस्ट किट उपलब्ध करुन दिले आहेत.तसेच कोरोना जास्त झालेल्या ठिकाणी किंवा गावात कॅम्प करुन टेस्टिंग करण्यात येणार आहे.यात एरंडोल तालुक्यातील ग्रामीण भागात उत्रान गु.ह.,उमरे,शिवाजी नगर शाळा (वनकोठे व बांभोरी परिसर), वीखरण, काढोली, कासोदा या गावात प्रत्येकी ५० प्रमाणे ३०० किट तसेच एरंडोल शहरात ज्या भागात जास्त कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण मागील १० दिवसात आढळले असतील अशा ४ भागात ५० प्रमाणे २०० किट असे एकुण ५०० किट देण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सदर कॅम्प तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी  सभापती,जिल्हा परिषद पदाधिकारी,सबंधित गावचे सरपंच,पोलीस पाटील,सबंधित गावचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य,शहरी भागातील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाधिकारी तसेच लोकसहभागातुन स्वब कॅम्प आयोजित करावयाचे आहेत तसेच आमदार यांना दूरध्वनी वर कळवून त्यांच्या पदाधिकऱ्यांचे सहकार्य घ्यावयाचे आहे व तसा दररोज चा अहवाल कार्यालयाला करावयाचे पत्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.