निपाणे, ता. एरंडोल( वार्ताहर) : एरंडोल रिंगणगाव कासोदा उत्राण या चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा अति वृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचा पिक विमा आ,चिमणरावजी पाटील यांच्या भरीव प्रयत्नाने मंजूर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने शेतकरी वर्गाच्या तोंडावर हसू फुलले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार चिमणरावजी पाटील यांच्यासह विमा कंपनीचे आभार व्यक्त केले आहेत.
गेल्या तिनं वर्षा पूर्वी विमा कंपनीने भरलेल्या पैशातून कपात करुन पैसे दिले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा विमा कंपनीवरील विश्र्वास उडाला होता मात्र आता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याने अनेक शेतकरी पिकांचा विमा घेण्यासाठी पुढे येणार असल्याचे बोलले जात आहे अखेर मात्र शेतकरी वर्गाला यश मिळाले आहे.

