आ.चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामीनीताई पाटील यांनी फेडला नवस

0

बोदवड | प्रतिनिधी
तालुक्यातील उजनी दर्गा हे ऐतिहासिक धार्मिक स्थळ हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून ओळखले जात असून उजनी दर्गा येथील हजरत न्यामतुल्ला शाहवली बाबांच्या २३० व्या ऊर्सची सुरूवात दि.११ बुधवार रोजी बोदवड शहरातील संदल शरिफ आखाडा मोहल्ला येथील खादीम लुकमान शहा अमीर शहा यांच्या घरून संदल मिरवणुक काढून मोठ्या उत्साहात उजनी दर्गा येथे ढोल ताशांच्या गजरात,घोड्यांच्या मिरवणुकीचे उजनी दर्गावर फुलांची चादर चढवून करण्यात आली. या आनंद उत्सवानिमित्त येथे दि.१२ व १३ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज दि.१३ रोजी फतेहा खानी नमाजे जफरचा यांचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी जगात सुरु असलेल्या कोरोना व्हायरसची भीती झुगारून भाविक हजारों संख्येने उजनीत दाखल होत हा आनंदोत्सव साजरा करीत आहेत. आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भाविक हजरत न्यामतुल्ला शाहवली बाबांकडे मन्नत मानत असतात व मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक येथे आपली मन्नत पुर्ण करण्यासाठी नवस(मन्नत) फेडण्यासाठी येत असतात. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे चंद्रकांत पाटील हे आमदार व्हावेत,यासाठी बोदवड येथील मुस्लिम बांधवांनी उजनी दर्गा येथील हजरत न्यामतुल्ला शाहवली बाबांकडे मन्नत मानली होती.मुस्लिम बांधवांच्या तसेच जनसामान्यांच्या दुव्याने व न्यामतुल्ला बाबांच्या आशिर्वादानाने चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार झाले.त्यामुळे येथे मानलेली मन्नत बुधवार दि.११ रोजी पुर्ण करण्यात आली. आ.चंद्रकांत पाटील हे मुंबई येथील अधिवेशनाला असल्याने यांच्या सौभाग्यवती सौ.यामीनीताई चंद्रकांत पाटील यांचेहस्ते उजनी दर्गा येथे बाबांना चादर चढवून ही मन्नत पुर्ण करण्यात आली. यावेळी हजारो मुस्लिम बांधव व शिवसैनिक,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.पाटील यांची उपस्थिती नसतांनाही हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून अत्यंत श्रध्देने,आनंदाने व उत्साहाने हजरत न्यामतुल्ला शाहवली बाबांचा नवस फेडला.

Leave A Reply

Your email address will not be published.