जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
माजी मंत्री तथा जामनेर मतदारसंघाचे आ. गिरीश महाजन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधक चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून आ. गिरीश महाजन हे विविध विकास कामांच्या बाबत मतदारसंघात दौरे करत आहेत. शनिवार दि. ८ जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते.
याबाबत तयारी देखील करण्यात आलेली होती. मात्र शनिवारी सकाळी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल आला आहे. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी तातडीने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.