शेंदुर्णी (वार्ताहर) : आमदार गिरीश महाजन यांच्या वतीने जामनेर विधानसभा मतदार संघातील दिव्यांगांना तीन चाकी मोटारसायकल चे वाटप करण्यात येत असुन आज दुसऱ्या टप्प्यात शेंदुर्णीत ८ दिव्यांगांना मोटारसायकल चे वाटप करण्यात आले.
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या कार्यालयाच्या समोर आयोजित या कार्यक्रमात भाजपाचे नेते गोविंदभाई अग्रवाल, पं.दिनदयाल उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगांना या गाडीच्या चाब्या सुपुर्द करण्यात आल्या.
यावेळी गोविंद अग्रवाल यांनी आ.गिरिशभाऊ महाजन यांच्या या उपक्रमाच्या बद्दल आभार व्यक्त करत जामनेर तालुक्यातील सर्व दिव्यांगांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले तसेच शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील ६३दिव्यांगांना सानुग्रह अनुदान म्हणुन प्रत्येकी ३हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. यापुढेही जे दिव्यांग अजुनही बाकी असतील त्यांनी आपली कागदपत्रे नगरपंचायतीच्या कार्यालयात आणुन द्यावी त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक निलेश थोरात, सतिष बारी,श्याम गुजर,शरद बारी,पप्पु गायकवाड तसेच मान्यवर आदी उपस्थित होते.यावेळी दिव्यंगांनी हे वाहन मिळाल्याने आनंद व्यक्त केला असुन आ.गिरिशभाऊ महाजन यांचे आभार मानले आहे.