आ.गायकवाड यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी शिवसेनेकडून निषेध; कारवाईची मागणी

0

खामगाव (प्रतिनिधी) :जिल्ह्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळा भाजपा कार्यकर्त्यांनी जाळला. याबाबत शिवसेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला असून भाजपा कार्यकर्त्यांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना आज 19 एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे खामगाव तालुका व युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनात नमुद केल्यानुसार राज्यासह जिल्ह्यात कोरोना महामारीने भयंकर रूप धारण केले आहे. जिल्ह्यात कोरोना लस, ऑक्सीजन, रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर हे घाणरडे राजकारण करून आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करित आहे. जिल्ह्यात आ.गायकवाड यांचे प्रतिकात्मक पुतळे भाजपा कार्यकर्त्यांनी जाळले.

जमावबंदीचा आदेश असतांना सुद्धा त्यांनी उपरोक्त कृत्य केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून जाहीर निषेध करण्यात आला आहे. निवेदनावर उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, ता.प्रमुख सुरेश वावगे, युवासेना उपजिल्हा प्रमुख निलेश देवताळु, युवासेना शहराध्यक्ष राहुल कळमकार, उपशहर प्रमुख यांच्या स्वाक्षर्‍या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.