भुसावळ :- गेल्या काही दिवसापासून मुंबई येथे उपचार घेत असलेले माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचे आज पहाटे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खडसे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचे आज पहाटे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांनतर ते मुक्ताईनगर येथे गेले आहेत. दरम्यान खडसे यांच्या गैरहजेरीत जिल्ह्यामध्ये अनेक गडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे खडसे आता यावर काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.