आ. किशोर पाटील यांनी विकास कामांचा मांडला लेखाजोखा

0

जनसंवाद विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन : चार वर्षात पाचशे चौर्‍यांन्नव कोटीची विकास कामे

पाचोरा, दि. 4-
जनसंवाद विकासासाठी आमदार किशोर पाटलांची वचनपूर्ती जनसेवेची, या कार्यक्रमाव्दारे निवणूकीपूर्वी मतदारांना विकासकामांसंदर्भात दिलेल्या वचन पूर्ण करून पाचोरा-भडगांव मतदार संघात चार वर्षात पाचशे चौर्‍यांन्नव कोटीची कामे सादर करणारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात केलेल्या कामांचा हिशोब सादर करणारा पहिलाच आमदार म्हणून त्यांचे कडे पाहीले जात आहे. गेल्या चार वर्षांत आ.पाटील यांनी तालुक्यात व्यायम शाळा, समाज मंदिरे, रस्त्यांचे डांबरीकरण काँक्रेटिकरण, नदीवर पुल, पाणीपुरवठा योजना, जलसंधारणाची कामे, नविन ग्रामपंचायत कार्यालये, गटारी, नगरपालिका हद्दीत भुयारी गटारी, रस्ते, स्मशानभुमी, गार्डन, पिण्याच्या पाण्याच्या योजना, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, हायपस लॅम्प, हॅलोजन बल, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण, हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण, राममंदिराचे नुतणीकरण, भाजीपाला मार्केट, राजीव गांधी टाऊन हॉल, वाचनालय, नविन अग्नीशमन दलाचे कार्यालय, तातडीची पाणीपुरवठा योजना, यासारखे सुमारे 1500 केलेल्या विकासकामांची गाव व रकमेनिहाय हिशोब दिला व या व्यतीरीक्त प्रस्तावित कामांची माहिती देवुन या नंतर या पुढे वर्षेभराचे काळात काय कामे करावी. हेही नागरीकांकडूनच जाणून घेतले. पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना वाघ तर सुत्रसंचलन संदिप केदार यांनी केले.
लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला
माजी आ. – आर. ओ. पाटील
मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेकडे किशोर पाटील यांना उमेदवारी देण्यासंदर्भात आग्रह केल्यानुसार सार्थक करून दाखवले. अनेक आमदार खासदार मंत्री केलेले कामे जनतेसमोर मांडण्यासाठी पुढे येत नाहीत कारण त्यांनी काहीच केलेले नसते. या बाबतच्या धाडसाचे किशोर पाटील यांचे कौतुक करण्या सारखे आहे. आज एक झंझावात सुरू झाला असुन मी चुकीचा उमेदवार दिला नाही. याचा मला अभिमान आहे. यावेळी खा. पाटील यांनी घेवून दाखवावा. कारण त्यांनी काही केलेले नाही. केवळ रेल्वे गाड्यांना थांबा दिला आता नागरीकही त्यांना थांबण्याचा सल्ला देत आहेत. यावेळी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 15 तारखेचा पाचोरा येथील कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आर. ओ. पाटील यांनी केले.
मी जनतेचा सालदार, म्हणून हिशोब देण्याची जबाबदारी माझीच -आ. किशोर पाटील
बाळासाहेब ठाकरे यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे ब्रिद वाक्यानुसार जनतेने पाच वर्षासाठी विकास कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असतो पाच वर्षात लोकप्रतिनिधीने काय केले हे विचारण्याची कुणाची हिंमत नसते व गावात जावून किंवा कार्यक्रमाचे आयोजन करुन सांगण्याची ही हिंमत लोकप्रतिनिधी करीत नाहीत. मात्र मतदार संघातील जनतेने मोठ्या अपेक्षेने माझेवर विश्वास टाकला आहे. *यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील (भडगांव), जि. प.सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, विकास पाटील, प्रताप हरी पाटील, मुकुंद बिल्दिकर, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, गणेश परदेशी, तालुका प्रमुख शरद पाटील, डॉ. विलास पाटील (भडगांव), निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्र सुर्यवंशी, डॉ. भगवान सावंत, कमलताई पाटील, माजी नगराध्यक्षा सुनिता पाटील, डॉ. भरत पाटील, अ‍ॅड. दिनकर देवरे, राजू पाटील, उध्दव मराठे,पप्पू राजपूत, अनिकेत सुर्यवंशी, मतीन बागवान, वसीम शेख, शकिर बागवान, अ‍ॅड. राजेंद्र परदेशी, डॉ. शेखर पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, शितल सोमवंशी, बापू हटकर, संजय पाटील, पंढरीनाथ पाटील, दिपक पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना आ. पाटील यांनी समर्पक उत्तरे दिली.
आ. देशमुखांनी चाळीसगाव साठी गिरणा धरणाहुन पाईप लाईन केली. मात्र दिलीप वाघ यांनी तसे का केले नाही . मी पाचोरा भडगाव शहरासाठी गिरणेहुन पाईप लाईन द्वारे पाणी आणण्याचा प्रस्थाव सादर केला आहे. व तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे काळात भडगाव येथे आर. टी. ओ. कार्यालयाचा प्रस्थाव दाखल करण्यात आला होता. त्याचे पुढे काय झाले ? व पाचोर्‍याच्या जिल्हासत्र न्यायालयाचा प्रश्न का मार्गी लागला नाही. सत्तांतर झाल्याने आर.टी.ओ. कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्याचा मी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. पाचोरा येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाबतीत चाळीसगाव ला मोठ्या प्रमाणात क्राईम असल्याने न्यायालय तेथे देण्यात आले. ना. महाजन यांनी गिरणेवर 7 बलुन बंधार्‍यास मंजुरी मिळवली आहे. मात्र त्यासाठी अजुन एक रुपयाही निधी मंजूर झालेला नाही. ते जनतेची दिशाभूल करित असुन गिरणेत जर पाणीच साचले नाही तर त्या बलुन बंधार्‍यांचे काय .औद्योगिक वसाहत भुसावळ येथे हलविण्यात येणार होती. मात्र तेथे जागेचा व तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्याने मी रेल्वे प्रशासनाकडे प्रयत्न करुन त्यास नगरदेवळा येथील सुतगिरणीच्या जागेवर रेल्वेचा इंजिनची दुरुस्ती, नविन बोग्या निर्मिती या एक हजार कोटी रुपयांच्या प्रस्थावास मंजुरी मिळाली आहे. याठिकाणी 51 हेक्टर जागा असुन आजुबाजुच्या गावातील ग्रामपंचायतींची गायराण जमिन उपलब्ध होणार असल्याने याशिवाय याठिकाणाहुन मुंबई – नागपुर हायवे रोड, रेल्वे, विज वितरण कंपनीचे सबस्टेशन आणि गिरणेहुन पाण्याची सोय होणार असल्याने तीन महिन्यात एम.आय.डी.सी. चा प्रश्न मार्गी लागेल. व हजारो युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. मात्र त्यावेळी ए. टी. पाटील यांचे ऐवजी आर.ओ. (तात्या) पाटील. असे देखिल सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.