जळगाव : तालुक्यातील आसोदा येथील दिवाकर महाजन यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी आसोदा गावी दिवाकर महाजन यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत रामचंद्र पावरा या इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकार पोलीस पाटील आनंदा बि-हाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी तालुका पोलिसात खबर दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि जीएस चव्हाण करत आहेत. दरम्यान पावरा याला दारूचे व्यसन असल्याने तो विहिरीत पडला असल्याची माहिती पुढे येत आहे.