नवी दिल्ली :-गुजरातमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला आज सूरत सत्र न्यायालयानं जहांगीरपुरा आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्याला ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
बलात्काराप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरतमधील न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. नारायण साईच्या शिक्षेबाबत न्यायालय ३० एप्रिल रोजी निर्णय देणार आहे.
आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात सूरतमधील बहिणींनी बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात नारायण साईला सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. पोलिसांनी पीडित बहिणींचे जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. आसारामविरोधात गांधीनगरमधील कोर्टात खटला सुरू आहे. नारायण साईविरोधात कोर्टानं आतापर्यंत ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत.