नवी दिल्ली : लैंगिक शोषण प्रकरणात आसाराम बापूला आज सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर आहे.
आसाराम बापूने जमीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला दिलासा न देता त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर 2013 मध्ये आसारामबापूला इंदूर येथील आश्रमातून अटक करण्यात आली होती. आसारामचा मुलगा नारायण साईवरही बलात्काराचे आरोप आहेत त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.