Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आसाममधील 24 जिल्ह्यांना पुराचा फटका; 111 जणांचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    आसाममधील 24 जिल्ह्यांना पुराचा फटका; 111 जणांचा मृत्यू

    By July 21, 2020No Comments30 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गुवाहाटी । आसाम (Assam) मध्ये ब्रम्हपुत्र नदीला आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवित हानी झाली आहे. पूरामुळे आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक पूरग्रस्त भागात अडकले असून त्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम सुरु आहे. या पुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क मधील प्राण्यांनादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

    आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या (ASDMA) रिपोर्टनुसार, ब्रह्मपुत्रा नदीने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसाममधील 24 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. तर 24 लाखहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. एनडीआरएफ NDRF टीमकडून सतत रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. काझीरंगा नॅशनल पार्कचा 85 टक्के भाग पूर परिस्थिती आहे. त्यामुळे येथील संरक्षित वन्य प्रजाती अस्तित्वावर मोठं संकट उभं राहिलं आहे. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 113 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 140 प्राण्यांना वाचवण्यात यश आलं आहे.

    सोमवारी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान मोदींशी फोनद्वारे चर्चा केली. या चर्चेत आसाममधील गंभीर पूरस्थिती, कोरोना व्हायरस आणि बागजान तेल विहिरीत लागलेल्या आगीबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतली. पंतप्रधानांनी राज्याबद्दल चिंता व्यक्त करत, शक्य त्या सर्व मदतीचं आश्वासन दिलं आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif