शेंदुर्णी :- आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी नेहमीप्रमाणे सरस्वती विद्या मंदिराच्या विद्यार्थी संतांच्या पोषाखातील,विठ्ठल रुक्मिणी, वारकऱ्यांच्या वेषात टाळ मृदुंगाच्या घोषात तल्लीन होत विठु रायाचा गजर करत दिंडीत सहभागी झाले होते.
सरस्वती विद्या मंदिरा पासुन शहरातील मुख्य मार्गावर प्रारंभी अश्व,डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात पताका घेत विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.यात संस्थेच्या चेअरमन डॉ. कौमुदी साने ,परिवाराचे सदस्य, संचालक मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, सौ.शिलाबाई पाटील सर्व शिक्षक ,कर्मचारी सहभागी होते.चौकाचौकात दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.श्री त्रिविक्रम मंदिरात दिंडीची सांगता झाली.