Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आशिया खंडातील मुलींच्या पहिल्या शाळेला “राष्ट्रीय स्मारक” घोषित करा
    जळगाव

    आशिया खंडातील मुलींच्या पहिल्या शाळेला “राष्ट्रीय स्मारक” घोषित करा

    By September 3, 2020No Comments14 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अन्यथा तमाम फुले प्रेमीं व विविध संघटना कडून आंदोलनाचा इशारा

    धरणगांव (प्रतिनीधी) : अशिया खंडातील मुलींची पहीली शाळा वाचविण्यासाठी व राष्ट्रीय स्मारक घोषीत करावे यासाठी “आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती, माळी समाज पंचमंडळ धरणगांव , छत्रपती क्रांती सेना, बहुजन क्रांती मोर्चा, महात्मा फुले ब्रिगेड, सावता माळी युवा संघ, म.फुले समता परिषद, महात्मा फुले युवा क्रांती मंच, भारत मुक्ती मोर्चा, बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्क व समस्त फुले प्रेमी वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

    राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहीली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादीत करून “राष्ट्रीय स्मारक ” म्हणुन घोषीत करून विकसीत करावे.

    देशातीलच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा प्रसिद्ध आहे. राष्ट्रपिता – सत्यशोधक – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी , १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली. ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडी- अडचणींचा सामना करून , शेण – माती – चिखल विरोध पत्करून बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली.आज त्या भिडेवाड्यातील शाळेची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे. हे तमाम फुले प्रेमींसाठी वेदनादायक आहे.

    सदरील जागा शासनाने लवकरात लवकर भूसंपादीत करून त्या वास्तुला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषीत करून विकसीत करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात ” आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती व समस्त फुले प्रेमीं “च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी.
    तहसीलदार यांना निवेदन देतांना आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती सदस्य, माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष विठोबा महाजन, उपाध्यक्ष – योगराज माळी, सचिव – दशरथ महाजन, कोषाध्यक्ष – व्ही.टी. माळी, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष – लक्ष्मण पाटील, बामसेफ तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र वाघ, महात्मा फुले ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नरेंद्र (राजु) महाजन, विभागीय अध्यक्ष – डॉ. देवरे, समता परिषदेचे धनराज माळी सर ,बामसेफ चे उपाध्यक्ष – हेमंत माळी, महासचिव – आकाश बिवाल, महात्मा फुले युवा क्रांती मंचचे आर.डी. महाजन, पुण्यनगरीचे युवा पत्रकार – जितेंद्र महाजन, सावता माळी युवा संघाचे शहराध्यक्ष – जयेश महाजन, तालुकाध्यक्ष – निलेश माळी, प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र महाजन, सामाजिक कार्यकर्ते विनायक महाजन, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोरख देशमुख, बुद्धिष्ट इंटरनेशनल नेटवर्कचे निलेश पवार, गजानन महाजन, पवन महाजन, मनोज महाजन, पंकज महाजन, आकाश महाजन, ज्ञानेश्वर महाजन, चेतन माळी व धरणगांव शहरातील समस्त फुलेप्रेमी उपस्थित होते. सदर निवेदन शासनाच्या नियमात राहुन, मास्क लावुन देण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif