आशियाच्या जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

0

जळगाव | प्रतिनिधी 
सध्या असलेली कोरोनाची परिस्थिती आणि या जागतिक आपत्तीनंतर बांधकाम क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान घेऊन उपलब्ध होणाऱ्या संधीविषयी जगभर जागतिक डिजिटल बांधकाम महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. आशिया खंडातील परिषद ५ जुलैपासून सुरू होत आहे. मंगळवार दि.६ रोजी जळगाव येथील युवा अभियंता गौरांक प्रशांत पाटील हे परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असून ते ‘बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग अँप्लिकेशन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

बांधकाम क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असून जगभरात त्याचा उपयोग केला जात आहे. जगभरातील निवडक बांधकाम अभियंत्यांचे मार्गदर्शन जगभरातील अभियंत्यांना मिळावे यासाठी जागतिक डिजिटल बांधकाम महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल कन्स्ट्रक्शन हा ऑनलाईन डिजिटल कन्स्ट्रक्शनचा सर्वात मोठा आभासी कार्यक्रम आहे.

आशिया खंडाची परिषद ५ जुलैपासून सुरू होणार असून त्यात जळगाव येथील युवा अभियंता गौरांक प्रशांत पाटील हे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहभागी होत आहे. परिषदेत गौरांक पाटील हे BIM बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग या विषयाची ओळख करून देणार असून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या समन्वयाने अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम (EPC) प्रोजेक्ट संदर्भात मार्गदर्शन करणार आहे.

गौरांक हा माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांचा मुलगा असून त्याने पुणे विद्यापीठातून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच पुणे येथून ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पीजीपी आणि एमबीए पूर्ण केले आहे. जळगावातील एका युवा अभियंत्याची जागतिक स्तरावरील परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी निवड होणे ही जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे.

भारतीय वेळेनुसार गौरांक पाटील हे दि.६ रोजी सकाळी ७.४५ वाजता मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेश असून सर्वांना मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सहभागी होण्यासाठी  https://www.festivalofdigitalconstruction.com/register-for-digital-construction-asia या लिंकचा उपयोग करावा.

गौरांक पाटील यांचे आजवरचे यश

विशेष गौरव, सन्मान :

  1.  उरल फेडरल युनिव्हर्सिटी, रूस येथे पदवीधर फेलोशिपमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार
  2.  यूएसएएल फेडरल युनिव्हर्सिटी, रशिया येथे पदवीपूर्व फेलोशिपमध्ये सिव्हिल विभागातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार.

शोधनिबंध प्रकाशित :

  1.  सोलर शेअरींग व प्रकाश अपवर्तनाच्या तत्त्वाचा उपयोग करून शेतात उत्पादन आणि बाष्पीभवन कमी करणे.
  2.  रचना नियोजन, बांधकाम कामे (अभियांत्रिकी) मंजूर करणे व देखरेखीसाठी बीआयएम फ्रेमवर्कचा प्रस्ताव. यासह ३८ शोधनिबंध आजवर प्रकाशित झाले आहेत.

‘गौरांक’चा ब्लॉग :

माझा अभियांत्रिकीचा प्रवास –

(www.gaurankpatil.blogspot.in)

अतिथी व्याख्याने आणि विषय :

  1.  रोटरी क्लब पिंपरी चिंचवड आयोजित ‘रिसर्च पेपर’ कसे प्रकाशित करावे.
  2.  एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स पुणे द्वारा आयोजित संशोधन पेपर लिहिणे
  3. ईपीसी प्रकल्पांमध्ये बीआयएम व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे अर्ज – झील एज्युकेशन सोसायटी, पुणे आयोजित.

Leave A Reply

Your email address will not be published.