आशादीप वसतीगृहात असा प्रकार घडलाच नाही ; गृहमंत्री अनिल देशमुख

0
24

मुंबई । जळगाव येथील शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मच्यानी महिलांना नग्न नृत्य करायला लावल्याची बातमीने खळबळ उडाली होती. विरोधी पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. मात्र आशादीप वसतीगृहात असा प्रकार घडलाच नसल्याची माहिती समितीने केलेल्या चौकशीतून समोर आल्याची माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, जळगावातील आशदीप महिला वसतीगृहातील कथित व्हिडीओ प्रकरण चांगलेच गाजत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच उच्च स्तरीत समितीचे गठन करून चौकशी करून दोन दिवसात अहवाल मांडण्यात येईल असे जाहीर केले होते.

 

या अनुषंगाने आयएएस अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या नेतृत्वाखालील समितीने काल सकाळी दहापासून रात्री उशीरापर्यंत चौकशी केली. यानुसार आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन दिले. यात म्हटले आहे की, त्या वसतीगृहात काही दिवसांपूर्वी काही महिला गाणी म्हणत होत्या. मात्र यात आरोप करण्यात येत असलेला प्रकार झालाच नाही. यामुळे हे प्रकरण कपोलकल्पीत असल्याचे गृहमंत्री म्हणाले. तर, या प्रकरणी अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई होईल असेही गृहमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here