आव्हाणे ता. जळगाव ;- जळगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर निवडणूकीच्या प्रचारार्थ आव्हाणे गावातील पदाधिकारी, ग्रामंस्थ व युवा कार्यकर्त्याशी सवांद साधत खऱ्या ग्रामविकासाठी परिवर्तनाचे आवाहन केले. प्रारंभी गावातील मारूती मंदिरात पूजा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करत वंदन केले.
यानंतर प्रचार व संवाद रॅलीत ग्रामस्थांनी गावातून अधिक मताधिक्ये देण्याचे अश्वासन दिले. या दरम्यान अनेक ठिकाणी महिला बहिणींकडून औक्षण करत आशिर्वाद दिलेत.
या प्रचार व सवांद रॅलीत राष्ट्रवादी आघाडीचे नेते , विविध सेलचे पदाधिकारी यांच्या सोबत गावातील पदाधिकारी व ग्रामंस्थ मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.