आला रे आला मान्सून आला…! मान्सून केरळमध्ये दाखल

0

मुंबई: मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. केरळच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीचं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे कार्यकारी संचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार केरळच्या दक्षिण भागात मान्सून धडकला आहे.

भारतीय हवामान विभागनं यापूर्वी मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होईल, असं म्हटलं होते. मात्र, त्यानंतर 31 मे रोजी मान्सून दाखल होईल, असं सांगण्यात आलं. भारतीय हवामान विभागानं पुन्हा नवीन माहिती देत 3 जूनला मान्सून दाखल होईल, असं सांगितलं होतं त्याप्रमाणं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

दरवर्षी साधारणपणे मान्सून 1 जूनला दाखल होतो, यंदा दोन दिवसं उशिरानं केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सून दक्षिण अरबी समूद्र, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन मालदिव भागात सक्रिय झाल्याचं सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.