अमळनेर (प्रतिनिधी) : आर के नगर परिसरात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत परिस्थतीची माजी आमदार साहेबराव पाटिल यांनी पहाणी केली पुन्हा प्रांताधिकारी , तहसीलदार व मुख्याधिकारी,यांच्या लक्षात परिस्थिती चे गांभीर्य आणून देत. तात्काळ तिसऱ्या दिवशी आर के नगर परिसरात उपाययोजनांना सुरवात करण्यात आली आहे.
नगरपालिकेचे पालक नेतृत्व मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आज न पा चे बांधकाम अभियंता आणि मुरूम चे ट्रॅक्टर, डंपर असा लवाजमा घेऊन आर के नगरच्या भागात धडक देत कामाला सुरुवात केली.स्वतः सलग ३ ते ४ तास भर उन्हात थांबून स्थानिक नागरिकांच्या सोयीनुसार ७० वर्षाचा उमद्या व्यक्तिमत्वाचा तरुण मनाचे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी प्रत्येक भागात स्वतःच्या देखरेखीखाली तात्पुरत्या उपाययोजना ची अंमलबजावणी आज सुरू केली.
यावेळी सोबत नगरसेवक राजेश पाटील, नगरसेवक श्याम पाटिल,न पा चे अधिकारी यांचे सह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे , दिपक नांद्रे, भूषण भदाणे ,जगदीश पाटिल आदिंसह परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते.
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, मुख्याधिकारी यांचा नागरिकांनी केला सत्कार
सदर परिसरात तात्काळ मुरूम टाकून तात्पुरते रस्ते वापरायला उपलब्ध करून दिले तर साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी भर टाकून व्यवस्था करण्यात येत आहे. मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या धडाकेबाज कार्यपद्धती बद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे तर तरुणांना लाजवेल असे काम कोरोना साथीच्या काळात नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी स्वतः तासनतास थांबून करून घेतल्याने स्थानिक नागरिक संजय भदाणे,बाबुराव देसले,राजेंद्र सोनवणे, प्रभाकर देसले, ऍड किशोर बागुल आदींनी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल,मुख्याधिकारी सौ विद्या गायकवाड यांचा सॅनिटायझर आणि मास्क सप्रेम भेट देऊन सत्कार केला . यावेळी नगरसेवक राजेश पाटिल,श्याम पाटिल सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,नगरसेवक पप्पू पहाडे ,बांधकाम व्यावसायिक सरजूशेठ गोकलाणी अधिकारी, संजय चौधरी,बांधकाम अभियंता अमोल भामरे,हरीश पाटिल आदिंचीही यावेळी उपस्थिती होती.