पाचोरा (प्रतिनिधी) : दि. १० रोजी रात्री अचानक धगाळ वातावरण होवुन सौम्य वादळासह विजांच्या कळकळ्यात पावसाच्या रिमझीम सरी बरसल्या. तालुक्यातील अार्वे गावातील पंढरीनाथ पाटील यांचे रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतातील नारळाच्या झाडावर अचानक विज पडली. झाडावर विज पडल्याने झाडाने पेट घेतला. सुदैवाने बाजुला असलेला गुरांचा चारा व जवळच्या शेतातील गुरे वाचली. तसेच शेतकरी रात्रीची लाईट नसल्यामुळे सुदैवाने शेतात नव्हते. म्हणून कुठलीही जिवीत अथवा वित्तहानी झाली नाही.