आर्थिक मंदीचा फटका ; चालू वर्षात ‘इतक्या’ लाख नोकऱ्या कमी होणार !

0

मुंबई: आर्थिक मंदीचा परिणाम देशभरातील रोजगार निर्मितीवरही पडत आहे. आर्थिक मंदीमुळे चालू वित्त वर्षात जवळपास 16 लाख रोजगारांच्या संधी कमी होणार आहेत. एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव यूपी, बिहारसारख्या राज्यांवर मोठ्या प्रमाणात पडणार आहे. त्यामुळे या आर्थिक मंदीचा फटका रोजगारनिर्मितीला बसणार आहे.

यंदा सुरू असलेल्या आर्थिक वर्षात जवळपास १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. इकोरॅप रिपोर्टनुसार, वित्त वर्ष 2018-19मध्ये ईपीएफओनं देशभरात ८९.७ लाख नव्या नोकऱ्या उत्पन्न होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी विकासदर हा सात टक्क्यांच्या जवळपास होता. तर 2019-20मध्ये विकासदर पाच टक्क्यांहून खाली येण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान त्यात यंदाच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात घट होणार आहे. या अहवालानुसार आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमधील नागरीक नोकरीच्या निमित्ताने परराज्यात, दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडून घरी पाठवण्यात येणाऱ्या रक्कमेत घट झाली असल्याचे समोर आले आहे. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात रोजगाराच्या संधी होत्या. मात्र, याच राज्यात रोजगारांच्या संधी कमी झाल्या असल्याचे समोर आले आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ)ने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८९.७ लाख नवे रोजगार निर्माण झाले होते. मागील आर्थिक वर्षात ज्यांना रोजगार मिळाले त्यांचे अधिकाधिक मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांच्या घरात होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.