चोपडा | प्रतिनिधी
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे योग दिनाचे यशस्वीआयोजन करण्यात आले होते. योग शिबिराचे उदघाटन जेष्ठ नेते तिलक काका शाह व योग शिक्षक श्री योगेश चौधरी यांनी केले. डॉ राहुल पाटील यांनी योगदिनाचे महत्व पटवून देताना आपल्या आयुष्यात योग चे अन्य साधारण महत्व आहे आपणास चांगले आरोग्य व शरीर सुदृढ़ ठेवण्यासाठी नियमित योग साधना करावी असे विचार मांडले. तसेच योग शिक्षक योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी वेगवेगळे योग आणि आसनांच्या आनंद घेतला. यावेळी प्रमुख म्हणून विस्तारक प्रदीप पाटील, जि प सदस्य गजेंद्र सोनवणे, यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री डॉ. राहुल पाटील, श्री तिलक काका शहा, श्री मनीष पारीख, डॉ सौ तृप्ती पाटील प्राचार्या परमेश्वरी, योगेश बडगुजर, प्रकाश पाटील, सुनील सोनगरे इत्यदि सह सर्व शिक्षक वृंद यांनी योग शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम सूत्रसंचालन नितेश वाघ यांनी तर आभार प्रदर्शन लिपिका नागदेव यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.