आर्किड इंटरनशनल स्कूल चोपडा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

0

चोपडा : येथील यशोधन चरिटेबल ट्रस्ट संचलीत आर्किड इंटरनशनल स्कूल मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आनलाईन पध्दतीने साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डा.श्री राहुल पाटिल यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पुजन केले. कार्यक्रमास ज्यु.के.जी, सिनि.के.जी. व इ.१ ली ते ४ थीचे विद्यार्थी  सहभागी झाले होते. इ.३री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी  स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे विचार कथन केले.

शाळेचे मुख्याध्यापक यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार व जीवनातील प्रसंग तसेच राजमाता जिजाऊ एक आर्दश गुरु व आई होत्या यावरील प्रसंग कथन केले. अध्यक्षिय भाषणातुन डा राहुल पाटिल यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श  गुणांची कास धरुन, जीवनात आचरणात आणून आदर्श  व्यक्तिमत्त्व  होण्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नितेश वाघ  यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार  पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, समन्वयक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.